सावधान! 3 दिवस हीटवेवचे अलर्ट
Weather news: महाराष्ट्रात पुढील 3 दिवस भीषण उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाने राज्यातील १४ जिल्ह्यांना उष्णतेचा अलर्ट जरी केला आहे.
तसेच महाराष्ट्रात वातावरण सध्या बदलत असून वादळ गेल्यानंतर आता हीटवेवचे अलर्ट करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्रातील काही जिल्हे हॉटस्पॉट बनले असून तापमान 45 डिग्री पर्यंत पोहचले आहे. महाराष्ट्रात उष्णता भडकली असून मराठवाडा आणि विदर्भ येथे उष्णता जास्त सांगण्यात आली आहे. मंगळवारी चंद्रपूर,अमरावती , अकोला येथील तापमान 44 डिग्री होते. तर सोलापूर आणि नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली येथील तापमान 43 नोंद झाले आहे.
तसेच गडचिरोली, मालेगाव, धाराशिव, परभणी, जळगाव, नाशिक, जेजुरी येथे ४२ डिग्री तापमानाची नोंद झाली आहे. आज म्हणजेच २३ एप्रिल रोजी या जिल्ह्यांमध्ये तापमान वाढणार आहे. अशी माहिती सामोर आली आहे. भारतीय हवामान विभागाने आज नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती येथे उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला असून महाराष्ट्र्र पुढील तीन दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे.
Edited By- Dhanashri Naik