शनिवार, 9 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 सप्टेंबर 2024 (09:41 IST)

'महायुती' सरकार दोन महिन्यात सत्तेवरून हटवणार- शरद पवारांचं मोठं वक्तव्य

sharad pawar
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी मोठे विधान केले आहे. महाराष्ट्रात येत्या दोन महिन्यांत एकनाथ शिंदे यांच्या ‘महायुती’ सरकारला सत्तेवरून हटवून छत्रपती शिवरायांच्या आदर्शावर नवे सरकार स्थापन होईपर्यंत विरोधक शांत बसणार नाहीत, असे पवार म्हणाले. मिळालेल्या माहितीनुसार मुंबईतील घाटकोपरमध्ये कार्यकर्त्यांना संबोधित करताना शरद पवार यांनी 26 ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात मराठा साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेवरून राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.  
 
राज्यातील सत्तेत असलेल्या लोकांचा शिवाजी महाराजांवर विश्वास नाही, असे शरद पवार म्हणाले. तसेच ते म्हणाले की, "मी तुम्हाला खात्री देतो की, तुम्ही तुमची एकजूट दाखवली, तर येत्या दोन महिन्यांत महाराष्ट्रात सरकार बदलेपर्यंत आणि शिवाजी महाराजांच्या आदर्शावर नवे सरकार स्थापन होईपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही." 
 
मालवण तालुक्यातील राजकोट किल्ल्यातील शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर राज्यात राजकारण तापले आहे. तसेच विरोधकांनी भाजप नेतृत्वाखालील महायुती सरकारवर 'भ्रष्टाचार' आणि शिवरायांचा 'अपमान' केल्याचा आरोप केला आहे. 

Edited By- Dhanashri Naik