मुंबईत मद्यधुंद प्रवाशाने बसचे स्टेअरिंग फिरवले, 9 जण जखमी, अनेक वाहनांचे नुकसान
मुंबईमध्ये रविवारी संध्याकाळी एक भीषण अपघात झाला. मुंबईत धावणाऱ्या बसने धडक दिल्याने 9 जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार बसमध्ये प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीचा बस चालकाशी काही कारणावरून वाद झाल्याचे सांगण्यात येत आहे. यादरम्यान मद्यधुंद व्यक्तीने बसचे स्टेअरिंग हिसकावले व ते फिरवले. यानंतर बसचे नियंत्रण सुटले. व बसने अनेक वाहनांना आणि रस्त्यावर चालणाऱ्या लोकांना धडक दिली. या अपघातात नऊ जण जखमी झाले आहे. सध्या जखमींना वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून या प्रकरणाचा तपास सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मद्यधुंद प्रवाशाने बस चालकाशी भांडण केले. लालबाग येथील गणेश टॉकीजजवळ बस पोहोचली असता अचानक त्याने स्टेरिंग पकडले, त्यामुळे वाहन चालकाच्या बस नियंत्रणाबाहेर गेले. बसने दोन मोटारसायकल, एक कार आणि अनेक नागरिकांना धडक दिल्याने नऊ जण जखमी झाल्याचे त्यांनी सांगितले. यातील तिघांची प्रकृती चिंताजनक आहे. सर्व जखमींना शहरातील विविध रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पोलिसांनी मद्यधुंद प्रवाशाला ताब्यात घेतले असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Edited By- Dhanashri Naik