1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Mahayuti Maharashtra Legislative Council Elections Candidate List

महायुतीने महाराष्ट्रात विधान परिषद निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली

Mahayuti Eknath Shide Devendra Fadnavis Sunetra Pawar
महायुतीने बुधवारी महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकांसाठी आपल्या उमेदवारांची यादी जाहीर केली. भारतीय जनता पार्टी, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट) यांची आघाडी असलेल्या महायुतीने एकूण १७ उमेदवारांची नावे जाहीर केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार निवडणूक १८ जून २०२६ रोजी होणार आहे असून मतमोजणी २२ जून रोजी होणार आहे.

महायुतीमध्ये जागावाटप असे आहे
भाजप: ११ जागा
शिवसेना (एकनाथ शिंदे): ४ जागा
राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार): २ जागा

भाजपचे अकरा उमेदवार  
वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली: अरुण लखाणी
भंडारा-गोंदिया: अविनाश ब्राह्मणकर
अमरावती: प्रवीण पोटे
सोलापूर: राजेंद्र राऊत
सांगली-सातारा: धैर्यशील कदम
अहिल्यानगर (अहमदनगर): प्राजक्त तनपुरे
छत्रपती संभाजीनगर-जालना: सुहास शिरसाट
नांदेड: अमर राजूरकर
धाराशिव-बीड-लातूर: बसवराज पाटील
जळगाव: नंदकिशोर महाजन
नागपूर: राजीव पोतदार

शिवसेनाचे चार (एकनाथ शिंदे)उमेदवार
ठाणे: रवींद्र फाटक
नाशिक: नरेंद्र दराडे
परभणी-हिंगोली: सईद खान
यवतमाळ: दुष्यंत चतुर्वेदी

राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन(अजित पवार) उमेदवार
रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग: अनिकेत तटकरे
पुणे: विक्रम काकडे

18 जून रोजी होणाऱ्या निवडणुकीत मतदारांनी महायुतीच्या उमेदवारांना प्रथम प्राधान्य द्यावे आणि दणदणीत विजय मिळवावा, असे आवाहन महायुतीने केले आहे. या उमेदवार यादीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि शिवसेनेचे महासचिव राहुल शेवाळे यांच्या स्वाक्षऱ्या आहे.
सर्व उमेदवारांना पाठिंबा मिळेल आणि विधान परिषद निवडणुकीत महायुती जोरदार कामगिरी करेल, अशी आशा महायुतीच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्याने सर्व पक्षांमध्ये निवडणूक हालचाली तीव्र झाल्या आहे. सर्व उमेदवारांना मजबूत करण्यासाठी रणनीती तयार करत असल्याचे संकेतही महायुतीने दिले आहे.
Edited By- Dhanashri Naik
About Writer
वेबदुनिया न्यूज टीम
वेबदुनियाच्या न्यूज डेस्क येथे आमचे वार्ताहर, विश्वसनीय स्रोत आणि अनुभवी पत्रकार यांनी तयार केलेले प्रत्यक्ष घटनास्थळावरील अहवाल, विशेष वृत्तांत, मुलाखती आणि रिअल-टाइम अपडेट्स प्रकाशित करण्यापूर्वी वरिष्ठ संपादकांकडून अत्यंत काटेकोरपणे तपासून घेतली जातात..... आणखी वाचा