बुधवार, 14 जानेवारी 2026
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 21 डिसेंबर 2016 (17:33 IST)

महेश झगडे याच्याकडून नवा आदर्श, लग्नाचा खर्च केला मुख्यमंत्री निधीत जमा

mahesh jhagade
अन्न व औषध प्रशासन विभागात काम करणा-या सनदी अधिकारी महेश झगडे यांनी समाजासमोर नवा आदर्श ठेवला आहे. महेश झगडे यांनी आपल्या मुलीचा विवाह अत्यंत साध्या पद्धतीने करत लग्नात होणारा खर्च मुख्यमंत्री निधीत जमा केला आहे.  'राज्यात ज्या शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत, त्यांच्या कुटुंबियांना दिलासा देण्यासाठी तुम्ही सर्वतोपरी प्रयत्नशील आहात. या प्रयत्नामध्ये एक खारीचा वाटा मदत म्हणून विवाहसोहळ्यावर होणा-या खर्चात बचत करुन तो निधी आत्महत्याग्रस्त शेतक-यांच्या कुटुंबियांकरिता द्यावा अशी इच्छा असल्याचं', महेश झगडेंनी मुख्यमंत्र्यांना पत्रातून सांगितलं आहे.