शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 14 एप्रिल 2023 (10:07 IST)

आंबेडकर जयंती मिरवणुकीत भीषण अपघात, विजेच्या धक्क्याने 2 जणांचा मृत्यू

death
महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात गुरुवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त रॅली आटोपून घरी परतत असताना अनेकांना विजेचा धक्का बसला. विजेच्या धक्क्याने दोघांचा मृत्यू झाला आहे, तर 4 जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी ही माहिती दिली आहे. ही घटना विरार परिसरात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
 
मिरवणूक संपवून लोक घरी परतत होते
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त विरारमध्ये बौद्धजन पंचायत समितीच्या वतीने मिरवणूक काढण्यात आली. रात्री नऊ वाजता सुरू झालेली मिरवणूक रात्री साडेदहा वाजता संपली. कारगिल चौकातून मिरवणूक संपवून कामगार घरी परतत होते. त्यावेळी ट्रॉलीवर 6 जण उभे होते, त्यावेळी गाडीवरील लोखंडी रॉड जवळच असलेल्या इलेक्ट्रिक ट्रान्सफरवर आदळला, त्यामुळे संपूर्ण ट्रॉलीमध्ये विद्युत प्रवाह गेला.
 
 वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला
वाहनातील 6 जणांना विजेचा धक्का बसला. यामध्ये 30 वर्षीय रूपेश सुर्वे आणि 23 वर्षीय सुमित सुत नावाच्या दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला. त्याचवेळी 4 जण जखमी झाले असून, 3 जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.