बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑगस्ट 2022 (21:08 IST)

मोठी कारवाई : सुमारे सव्वा कोटीचा विदेशी मद्यसाठा जप्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या विभागीय भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील आर्वी शिवारात सापळा रचत आयशर गाडीतून वाहतूक होणारा परराज्यातील विदेशी मद्यसाठा पकडला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने आयशर गाडी सुमारे सव्वा कोटीचा विदेशी मद्यसाठा असा एकूण दीड कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त करत चालकासह दोघांना ताब्यात घेतले आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी की, गोपनिय माहितीच्या आधारे रात्री आर्वी शिवारात महामार्गाच्या कडेला असलेल्या हॉटेल शांतीसागर जवळ राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने सापळा रचुन गोवा राज्यातील विदेशी मद्याचा साठा अवैधरीत्या वाहतुक करणार्‍या एमएच 12 एलटी 4255 क्रमांकाच्या आयशर मधून वाहतूक करण्यात येत होता.
वाहनाची तपासणी केली असता त्यात विदेशी मद्याचा साठा मिळून आला. 1 कोटी 23 लाख 37 हजार 920 रूपये किंमतीचा विदेशी मद्यसाठा व 22 लाखांचा ट्रक असा एकुण 1 कोटी 45 लाख 38 हजार 420 रूपये किंमतीचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. तसेच वाहन चालक शालू एके रामनकुट्टी (वय 42, रा. आसरखंडी, केदावुर, पो.तामरचेरी, जि.कोझीकोड केरळ) व क्लीनर शिवानंद शंकर कट्टीकार (वय 32 रा. बेन चिनमर्डी जि.बेलगम, कर्नाटक) यांना ताब्यात घेतले आहे.