1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
  4. major train accident at Digaru near Guwahati in Assam

आसाममध्ये मोठा रेल्वे अपघात, कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे ७ डबे इंजिनसह रुळावरून घसरले

आसाममध्ये एका मोठ्या रेल्वे अपघाताची बातमी समोर आली आहे. कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे इंजिनसह ७ डबे रुळावरून घसरले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,आसाममधील गुवाहाटीजवळ, दिगारू येथे एक मोठा रेल्वे अपघात झाला आहे. कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे सात डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. हा अपघात आसाममधील गुवाहाटीच्या बाहेरील दिगारू येथे झाला.

कोलकाता-सैरंग एक्सप्रेसचे सात डबे आणि इंजिन रुळावरून घसरले. दिगारू येथून ट्रेन जात असताना हा अपघात झाला. या अपघातात अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे.
पुढील लेख
वाघाच्या हल्ल्यात एका तरुणाचा मृत्यू; भंडारा जिल्ह्यातील ११ गावांमध्ये सतर्कतेचा इशारा