1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (09:36 IST)

Malegaon : माजी महापौरावर गोळीबार

मालेगावात माजी महापौरांवर गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.अब्दुल मलिक युनूस असं महापौरांचे नाव असून ते AMIM चे मालेगावचे महानगराध्यक्ष आहे. त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी 3 गोळ्या झाडल्या.या गोळीबारात ते गंभीर जखमी झाले आहे. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहे. 
 
सदर घटना मध्यरात्री 12 ते 1 वाजेच्या सुमारास घडली. तेमुंबई आग्रा महामार्गावर  एका हॉटेलवर चहा पिण्यासाठी बसले असता दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञातांनी त्यांच्यावर गोळीबार केला.त्यांच्यावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. 
 MIM आमदार मौलाना मुफ्ती यांनी त्यांची भेट घेत चौकशी करत सध्या मालेगावात गुंडाराज असल्याचे आरोप केले आहे. मलिक यांच्यावर हल्ल्यानंतर मालेगावात सध्या तणावाचे वातावरण आहे. 

Edited by - Priya Dixit