रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (20:52 IST)

सुषमा अंधारेंवर मालेगावात गुन्हा दाखल ; 'ते' वादग्रस्त वक्तव्य भोवलं

Sushma Andhare
मालेगाव : शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर मालेगाव तालुक्यात गुन्हा दाखल झाला आहे. हिंदू धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोप त्यांच्यावर करण्यात आला असून अमन परदेशी यांनी मालेगाव पोलिसात याबाबत तक्रार दाखल केली आहे.
 
त्यांच्या तक्रारीवरून सुषमा अंधारे यांच्या विरोधात भादवि कलम 295(अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे अंधारे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
 
शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली होती. या मुलाखतीत त्यांनी हिंदू धर्मियांचे पवित्र देवता श्रीराम व श्रीकृष्ण यांच्या संबंधी वादग्रस्त शब्दप्रयोग केला होता.
 
या शब्दप्रयोगांमुळे हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत, असा आरोप मालेगाव येथील अमन परदेशी यांनी केला. त्यामुळे परदेशी यांनी मालेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. परदेशी यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी सुषमा अंधारे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.