रविवार, 12 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 4 जानेवारी 2024 (20:49 IST)

सायकल चोरी करणाऱ्यांनाही शिवसेनेमुळे मानाची पद मिळाली, काय म्हणाले वैभव नाईक

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काही दिवसांचा अवधी शिल्लक असताना आता दुसरीकडे राजकीय आरोप प्रत्यारोप होऊ लागले आहेत. कोकणातही निवडणुकीपूर्वीच आरोप-टीकास्त्र सोडले जात आहे.
 
दरम्यान नारायण राणे आणि उदय सामंत हे दोघे आपल्या सोयीनुसार वेगवेगळी मंगळसूत्र बांधतात अशी बोचरी टीका शिवसेना ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी केली.
 
यावेळी ठाकरे गटाचे आमदार वैभव नाईक यांनी भाजप आमदार नितेश राणे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले. नारायण राणेंना शिवसेनेने मुख्यमंत्री केलं. सायकल चोरी करणाऱ्यांनाही शिवसेनेमुळे मानाची पद मिळाली असून ते मोठ्या मोठ्या गाड्यातून फिरू लागले असल्याचे नाईक यांनी म्हटले. बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या वर आमची निष्ठा असल्यामुळे आम्ही त्यांच्यासोबत आहोत असेही त्यांनी म्हटले.
 
दरम्यान नाईक यांनी म्हटले की, आज रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिंदे गटाचं अस्तित्व काय आहे हे नितेश राणेंनी सांगितलं. या मतदारसंघात शिंदे गटाला कधीही उमेदवारी मिळणार नाही. तर दीपक केसरकर आणि उदय सामंत येणाऱ्या निवडणूकीत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवतील असा दावा त्यांनी केला.