शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (15:37 IST)

'या' अटीमुळे मुंबईतील मॉल्स आणि शॉपिंग सेंटर अद्यापही बंद

राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्यामुळे ब्रेक द चेन अंतर्गत  सरकारने मॉल्स आणि शॉपिंग सेंटर रात्री १० वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास परवानगी देण्यात आली. मात्र राज्य सरकारच्या एकाअटीमुळे मुंबईतील मॉल्स आणि शॉपिंग सेंटर अद्यापही बंदच आहे. कारण मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी सर्व कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधात्मक लशीचे दोन डोस आणि दुसरा डोस घेऊन १४ दिवस पूर्ण होणे आवश्यक आहे.याच एका अटीमुळे मुंबईतील बरेच मॉल्स आणि शॉपिंग सेंटर खुले होऊ शकले नाही आहेत.
 
राज्य सरकाराने मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी घातलेली ही अट शिथिल करण्याची मागणी आता कर्मचारी वर्ग करत आहेत. कारण मॉल्स आणि शॉपिंग सेंटरमध्ये असलेल्या ९० टक्के कर्मचाऱ्यांचे वय ४५ वर्षांपेक्षा कमी आहे. यामुळे राज्य सरकारची परवानगी असूनही मुंबईतील मॉल्स आणि शॉपिंग सेंटर बंदच ठेवण्याची परिस्थिती ओढावली आहे. 
 
१५ ऑगस्टपासून मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्याची परवानगी देण्यात आली. मात्र दोनच दिवसात अत्यल्प कर्मचाऱ्यांमुळे मॉल्स बंद करण्याची वेळ आली आहे. रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने मॉल्स आणि शॉपिंग सेंटर सुरू करण्यासाठी दिलेल्या अटीचा राज्य सरकारने पुनर्विचार करावा,अशी मागणी केली आहे.