शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 18 ऑगस्ट 2021 (14:21 IST)

मोहरम सणासाठी नवीन नियमावली

उद्या मुस्लिम बांधवांचा मोठा सण मोहरम आहे.सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाखाली सर्वसण साध्या पद्धतीने  साजरे केले जात आहे.सर्व सणासाठी कोरोना प्रोटोकालचे पालन करून सण साजरे करा.अशी सूचना प्रशासनाकडून दिली जात आहे.उद्या मुस्लिम बांधवांचा मोठा सण मोहरम आहे.रमजान,ईद,बकरी ईद प्रमाणेच शासनाने मोहरमसाठी काही नियमावली जाहीर केली आहे.काय आहे ती नियमावली जाणून घेऊ या.
* यंदाच्या वर्षी धार्मिक आयोजनांवर बंदी असल्यामुळे सार्वजनिक ताजियांच्या मिरवणुकीसाठी परवानगी नाही.
* लसीकरण पूर्ण होऊन 14 दिवस झालेल्या भाविकांनाच ताजियाच्या मिरवणूककीत सामील होण्याची परवानगी असेल.
* ताजिया मिरवणूक पायी न काढता ट्र्कमधून ताजियाची मिरवणूक काढता येऊ शकेल.
* या ताजियांच्या मिरवणुकीत केवळ 7 ट्र्क सामील होऊ शकतात.
* मिरवणुकीत सामील असलेल्या एका ट्र्क वर केवळ 15 जणांना असण्याची  परवानगी देण्यात आली आहे.
* मातम मिरवणुका काढण्यास बंदी आहे.घरातच राहून मोहरमचा दुखवटा पाळावे.   
* पाणी वाटप करताना बाटलीबंद पाण्याच्या वापर करावा. 
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने दिलेले सर्व निर्देशांचा पालन करण्यास सांगण्यात आले आहे.