शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : गुरूवार, 29 सप्टेंबर 2022 (13:56 IST)

मनु कुमार श्रीवास्तव राज्याचे मुख्य सचिव

manukumar shrivastava
राज्याचे मुख्य सचिव म्हणून गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनु कुमार श्रीवास्तव यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी मुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती यांच्याकडून मुख्य सचिव पदाची सूत्रे स्वीकारली. चक्रवर्ती यांनी पुष्पगुच्छ देऊन  श्रीवास्तव यांचे स्वागत केले आणि शुभेच्छा दिल्या. मनु कुमार श्रीवास्तव यांचा जन्म १५ एप्रिल १९६३ रोजी झाला आहे. मूळचे लखनौ येथील श्री. श्रीवास्तव १९८६ मध्ये भारतीय प्रशासकीय सेवेत रुजू झाले. त्यांनी भौतिक शास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.
 
श्रीवास्तव यांनी धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, कोल्हापूर जिल्हाधिकारी, नागपूर जिल्हाधिकारी, नागपूर महानगरपालिका आयुक्त, मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव, महसूल आणि वन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव अशा विविध पदांवर काम केले आहे.