गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 8 ऑगस्ट 2022 (07:31 IST)

राज ठाकरे जी भूमिका घेतील तीच भूमिका राहणार मनविसेचे अमित ठाकरे यांनी दिली

Amit Thackeray
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे प्रमुख अमित ठाकरे सध्या नाशिक ग्रामीण दौ-यावर आहेत.विद्यार्थी सेना प्रमुख पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर पक्ष बांधणी करण्यासाठी आपण सध्या दौ-यावर असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. नाशिकच्या तीन दिवसीय दौऱ्यावर आहेत. कालपासून त्यांचा दौरा सुरू झाला आहे.
सध्याचे राजकारण पाहता तरुण पिढी राजकारणात यायला तयार नसल्याच विचारता आपणही जर अगोदर राजकारणात आले नसतो तर आपल्यालाही ते आवडले नसते अस सांगत पक्ष म्हणून मी जेव्हा जातोय तेव्हा तरुणां कडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याच त्यांनी सांगितले,ठाकरे नाव देशात मोठं असल तरी उध्दव ठाकरे वर जे राजकीय संकट आलय तेव्हा ठाकरे म्हणून आपली भूमिका काय राहणार हे विचारताच काहीच नाही अस सांगत राज ठाकरे जी भूमिका घेतील तीच भूमिका राहणार असल्याचे अमित ठाकरे यांनी पत्रकारांशी बोलतांना स्पष्ट केले.