गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जुलै 2023 (08:02 IST)

मुख्यमंत्रीपदाची अनेकवेळा संधी तरीही….दुसऱ्यांना संधी देण्यासाठी आता तरी थांबा- अजित पवार

ajit panwar
Ajit Pawar अनेकवेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसला मुख्यमंत्रीपदाची संधी असूनही वरिष्ठांच्या हट्टीपणामुळे ती मिळाली नाही. नेहमीच कनिष्ठांना डावलले जात असून नविन नेर्तृत्व पुढे येण्यासाठी वरिष्ठांनी आता थांबले पाहीजे असे अजित पवार यांनी म्हटले आहे. तसेच पहाटेच्या शपथविधीसाठी शरद पवारांनीच आपल्याला पाठवले असल्याचा दावा त्यांनी केला. ते आपल्या गटाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना ते बोलत होते. तसेच 2024 च्या निवडणुकीमध्ये नरेंद्र मोदी सरकारशिवाय पर्याय नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
 
वांद्रे येथील एमईटी मैदानावर अजित पवार गटाचा मेळावा सुरू होता ,  या मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना अजित पवार यांनी आपल्या वरिष्ठांसह अध्यक्ष शरद पवार यांच्यावरही टिका केली. आपल्या भाषणाच्य़ा प्रारंभी त्यांनी राष्ट्रवादीच्या इतिहास सागून शरद पवारांनी कोणकोणते निर्णय कशा प्रकारे घेतले याचा सारांश सांगितला.
 
ते म्हणाले, “मी साहेबांच्या छत्रछायेखाली तयार झालो आहे. सर्व धर्मातील लोकांनी गुण्यागोविंदाने नांदण्यासाठी माझा नेहमीच आग्रह आहे.”
 
अजित पवार त्यांच्या भाषणात शरद पवारांवर टीका करून राजकीय प्रवासात सत्ता मिळविण्यासाठी युती तोडल्याचा उल्लेख केला. त्यांनी 25 ते 75 वयोगटातील राजकारणी नेता प्रभावी ठरतो, भाजपमध्ये 75 वर्षानंतर निवृत्त केलं जात. पण साहेबांचा एव्हढा अट्टाहास का? असा सवाल त्यांनी शरद पवारांना केला. सोनिया गांधी परदेशी असल्यामुळे त्या पंतप्रधान होउ शकत नाहीत या मुद्द्यावरून काँग्रेसपासून फारकत घेण्याच्या निर्णयाबद्दल पवारांवर टिका केली.
 
पुढे बोलताना त्यांनी “2004 मध्ये आमच्याकडे बहुसंख्य आमदार होते, पण तरीही आम्हाला मुख्यमंत्रीपद न घेण्याचे सांगण्यात आले होते. त्यावेळी आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळाले असते, तर महाराष्ट्राने नेहमीच राष्ट्रवादीचे मुख्यमंत्री पाहिले असते,” असे अजित पवार म्हणाले. तसेच “आम्ही ही संधी का गमाववली? संधी असूनही असा निर्णय का घेतला गेला? तेव्हा आमच्यात काही कमतरता होती का? ” असा सवाल त्यांनी वरिष्ठांना विचारला.
 
बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांसोबत झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत अजित पवार यांनी पक्षाचे सर्व आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला. ते म्हणाले, “सर्व आमदार माझ्या संपर्कात आहेत. शरद पवार साहेबांच्या सभेत असेलेलीही आपल्या संपर्कात आहेत.”
 
तसेच “2014 मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात युतीचा प्रस्ताव दिला होता, पण नंतर तो प्रस्ताव मागे घेण्यात आला. २०१४ मध्ये, निवडणुकीचे निकाल येत असताना प्रफुल्ल पटेल यांनी आम्ही भाजपला बाहेरून पाठिंबा देऊ, असे जाहीर केले होते. २०१४ मध्ये वानखेडे येथे शपथविधी सोहळ्यासाठी आम्हाला जाण्यास सांगण्यात आले होते. जर आम्हाला त्यात सहभागी व्हायचे नव्हते, तर मग का जाण्यास सांगितले ?”
 
पुढे बोलताना ते म्हणाले, “2014 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप या प्रत्येक पक्षाने 16 जागा लढवून एकत्र निवडणुका लढवण्याचा प्रस्ताव मांडला होता. नंतर भाजपवर झालेल्या आरोपांमुळे यातून माघार घ्यावी लागली. नितीन गडकरींसारखे नेते या युतीसाठी इच्छुक होते, पण भाजपच्या स्थानिक नेत्यांनी यावर आक्षेप घेतला होता.” असेही ते म्हणाले.
2017 मध्ये राष्ट्रवादीने शिवसेनेबरोबर न जाता भाजपशी हातमिळवणी करण्याचा प्रयत्न केला होता. “शिवसेना जातीयवादी पक्ष असल्याने आम्ही सोबत जाणार नाही, असे आमचे नेते म्हणाले. त्यानंतर 2019 मध्ये आम्हाला शिवसेनेशी हातमिळवणी करण्यास सांगण्यात आले. 2017 मध्ये शिवसेना हा जातीयवादी पक्ष होता तर मग 2019 मध्ये काय झाले?” असा सवाल त्यांनी केला.
2019 च्या पहाटेच्या सरकार स्थापनेबाबतच्या गोंधळावर भाष्य करताना शरद पवार यांनीच त्यांना शपथविधीसाठी पाठवले असल्याचा गौप्यस्फोट केला. “या संबंधीच्या 5 बैठका एका मोठ्या उद्योगपतींच्या निवासस्थानी झाल्या होत्या. तेथे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते. निर्णय झाला आणि मला शपथविधीसाठी जाण्यास सांगण्यात आले. नंतर सर्व काही मागे पडले आणि आम्ही शिवसेनेसोबत गेलो.” असा खुलासा त्यांनी केला.