गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 5 जुलै 2023 (21:34 IST)

आज माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, पण माझं मनं रडतंय…! धनंजय मुंडे गहिवरले…

dhananjay munde
अजित पवार यांनी मुंबईतील वांद्रे भागातील एमईटी मैदानावर बैठक बोलावली आहे. यात बोलताना धनंजय मुंडे गहिवरले. आतापर्यंत सगळ्यात जास्त अपमान अजित पवार यांचा झाला.अजित दादांनी सगळ्यात जास्त ठेचा खाल्ला. त्यांना सगळ्यात जास्त मान खाली घालावी लागली, असं धनंजय मुंडे म्हणाले. अजित दादांवर आतापर्यंत बरीच टीका झाली. त्यांनी किती अपमान सहन केले. पण ते अपमान त्यांनी त्यांच्या सावलीलाही कळू दिलं नाही. प्रत्येक वेळेस त्यांच्यावर टीका झाली. पण त्यांनी साहेबांसाठी सगळं सहन केलं, असंही धनंजय मुंडे म्हणालेत.
 
आज या व्यासपीठावर बोलताना माझ्या डोळ्यात पाणी दिसत नसेल, पण माझं मनं रडतंय. अजितदादांना किती वेदना सहन कराव्या लागल्या असतील. पण ते कधीही काहीही बोलले नाहीत. त्यांनी सगळं सहन केलं. अजित दादांना सर्वात जास्त वेदना सहन केल्या आहेत, असं म्हणताना धनंजय मुंडे गहिवरले. माझ्यावरहील असाच अन्याय झाला. तेव्हा अजित दादा माझ्या पाठीशी होते. पण दादा मी तुम्हाला सांगू इच्छितो की, तुमची नियत साफ आहे. त्यामुळे नियती तुमच्या पाठीशी असेल असं धनंजय मुंडे म्हणाले.
 
अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीत एक सूर पाहायला मिळाला. अजित पवार यांच्यावर अन्याय झाल्याचं अजित पवार गटातील वरिष्ठ नेत्यांनी म्हटलं. धनंजय मुंडे, प्रफुल्ल पटेल यांच्या भाषणात अजित पवार यांच्या अपमानाचा मुद्दा समोर आला.
 
Edited By - Ratnadeep Ranshoor