शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 19 नोव्हेंबर 2018 (08:17 IST)

स्वतंत्र प्रवर्ग तयार करुन मराठा आरक्षण देणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा

राज्यातील मराठा समाजाला सामाजिक व शैक्षणिक (एसईबीसी) हा स्वतंत्र प्रवर्ग तयार करुन आरक्षण देण्यात येईल, अशी महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाने मराठा आरक्षणासंदर्भात केलेल्या तिन्ही शिफारसींचा विचार स्वीकारल्याचे जाहीर केले. सर्वोच्च न्यायालयाच्या असाधारण व अपवादात्मक परिस्थितीत आरक्षण देण्याच्या निकषानुसार मराठा समाज आरक्षणासाठी पात्र असल्याचे मागासवर्ग आयोगाच्या अहवालात नमूद करण्यात आलेय. या सर्व शिफारसी मंत्रिमंडळाने स्वीकारल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 
 
यानंतर आता वैधानिक कारवाईसाठी मंत्रिमंडळ उपसमिती स्थापन करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. तसेच धनगर आरक्षणासंदर्भातील अहवालही राज्य सरकारला मिळाला आहे. सध्या धनगर समाजाला व्हीजेएनटी या प्रवर्गानुसार आरक्षण आहे. मात्र, त्यांनी एससी या प्रवर्गाचे आरक्षण हवे आहे. या प्रवर्गात आरक्षण देण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. त्यामुळे राज्य सरकार यासंदर्भात लवकरच केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवेल, असे देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.