शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शुक्रवार, 16 नोव्हेंबर 2018 (15:39 IST)

मराठा आरक्षण : उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच

मुंबईतील आझाद मैदानात मराठा आरक्षण मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाचे सुरू असलेले उपोषण १५ व्या दिवशाही सुरूच आहे, मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत मागासवर्गीय आयोगाचा अहवाल राज्य सरकारला सादर झाला. मराठा समाजाच्या मागासलेपणावर त्यात शिक्कामोर्तब करण्यात आलंय. तरीही मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक आंदोलनावर ठाम आहेत. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन, उपोषण मागे नाही' असं आंदोलकांनी सांगितलंय. मागण्या पूर्ण करण्यासाठी आंदोलकांनी सरकारला शुक्रवारी संध्याकाळी पाच पर्यंतचे अल्टिमेटम दिलं आहे.
 
दुसरीकडे 'आंदोलन कशाचं करता ?, आता सरकार निर्णय घेणाराय. करायचंच असेल तर १ डिसेंबरला जल्लोष करा', अशी प्रतिक्रीया मुख्यमंत्र्यांनी  दिली  आहे. मात्र तरीही आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत.