शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

१५ आॅगस्ट रोजी घरोघर चूलबंद ठेऊन अन्नत्याग आंदोलन

९ ऑगस्टच्या महाराष्ट्र बंदच्या आंदोलनात गैरवर्तन करणारे समाजकंटक असून त्यांचा क्रांती मोर्चाचा कुठलाही संबंध नाही. सोबतच यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन केले जाणार नसल्याचे मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्यावतीने सांगण्यात आले.  आता येत्या १५ आॅगस्ट रोजी घरोघर चूलबंद ठेऊन अन्नत्याग आंदोलन आणि त्यानंतर मागण्या मान्य होईपर्यंत चक्री उपोषण केले जाईल, अशी माहितीही यावेळी देण्यात आली.
 
मराठा क्रांती मोर्चाकडून यापुढील काळातही आंदोलने शांततापूर्ण, अहिंसक व लोकशाही मार्गाने आयोजित केली जाणार आहेत. अन्य कोणत्याही व्यक्तींनी अथवा नेत्यांनी स्वतंत्रपणे कुठलेही आंदोलन करू नये. तसा कोणी प्रयत्न केल्यास त्यांचा आणि मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाचा कोणताही संबंध राहणार नाही ,असे मराठा मोर्चाचे समन्वयकांनी स्पष्ट केले आहे.