मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (11:27 IST)

मंत्री तानाजी सावंतांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक

marath kranti morcha
मराठा आरक्षणाच्या आंदोलनावर आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मराठा क्रांती मोर्चा आक्रमक झाली असून तानाजी यांनी या शिंदे सरकारच्या काळात मराठ्यांना आऱक्षण मिळेल परंतु या विषयचा उल्लेख करणाऱ्या आणि वातावरण गढूळ करणाऱ्यांना ओळखावे .राष्ट्रवादीने मराठा आरक्षणावर दुट्टपी भूमिका घेतल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. 
 
मराठा क्रांतो मोर्चा ने त्यांच्या या वक्तव्यावर संताप व्यक्त केला असून मराठा मोर्चाचे समन्वयक योगेश केदार यांनी तानाजी सावंत यांना सडेतोड उत्तर दिले आहे. केदार म्हणाले तुम्ही भाषणात काय बोलता आणि कोणासाठी बोलता ह्याच तरी भान राखा.  तुम्हाला यावर काही भूमिका घेणे शक्य नसेल तर त्याचा विरोधही करू नका. आम्ही सामान्य मराठे काही कुणी तुमच्या विरोधकांनी सोडलेली पिलावळ नाही. समाजात काहीही बोलाल तर ते सहन केले जाणार नाही. सावंतांनी मराठा समाजाची माफी मागावी असे केदार म्हणाले.