सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 26 सप्टेंबर 2022 (08:52 IST)

मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी समुद्राखाली बांधण्यात येणारा हा देशातील पहिलाच बोगदा

मुंबई-अहमदाबाद दरम्यान धावणाऱ्या बुलेट ट्रेनसाठी २१ किमी लांबीचा बोगदा तयार केला जाणार आहे. यामध्ये सात किलोमीटर लांबीचा बोगदा समुद्राखाली असेल. समुद्राखाली बांधण्यात येणारा हा देशातील पहिलाच बोगदा असून, यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडने निविदा मागवल्या आहेत. राज्यात सरकार बदलल्यानंतर बुलेट ट्रेनच्या कामाला वेग आला असून, यापूर्वी मागविण्यात आलेल्या निविदा माघारी घेण्यात आल्या आहेत.
 
यापूर्वी मागविण्यात आलेल्या निविदा माघारी घेण्यात आल्या असून, त्या नव्याने काढण्यात येत आहेत. बुलेट ट्रेनसाठी तयार होणाऱ्या या रेल्वे मार्गासाठी एकच सिंगल ट्यूब बोगदा असेल, ज्यातून अप आणि डाउन ट्रॅक असेल. या भागामध्ये बोगद्याच्या सभोवतालच्या ३७ ठिकाणी ३९ उपकरण खोल्या बांधण्यात येणार आहेत.
 
बोगदा तयार करण्यासाठी...
रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, या बोगद्याच्या बांधकामासाठी १३.१ मीटर व्यासाचे कटर हेड असलेले टीबीएम वापरले जातील.
मेट्रो प्रणालीमध्ये वापरल्या जाणाऱ्या बोगद्यांसाठी साधारणपणे पाच ते सहा मीटर व्यासाचे कटर हेड वापरले जातात.
१६ किमीचा बोगदा करण्यासाठी तीन टनेल बोरिंग मशीन वापरण्यात येतील.