मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 फेब्रुवारी 2022 (08:44 IST)

सिगारेटचे चटके देऊन विवाहितेचा छळ; गुन्हा दाखल

नाशिक चारित्र्याच्या संशयातून अंगावर सिगारेटचे चटके देऊन विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी विवाहिता 10 फेब्रुवारी ते दि. 20 मार्च 2020 या कालावधीत पुण्यातील आकुर्डी येथे सासरी नांदत असताना पती शशिकांत जाधव, सासू उषाबाई जाधव, सासरे किशोर भिकूजी जाधव, मावससासू आशाबाई बोरसे, मामेसासरे दीपक देवरे, पतीची आजी जिजाबाई तुकाराम देवरे यांनी संगनमत करून विवाहितेच्या पांढर्‍या डागाच्या शारीरिक व्यंगावरून सतत हिणविले.
 
तसेच आईवडिलांकडून पैसे घेऊन येण्यासाठी तगादा लावला. एवढेच नाही, तर विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या अंगाला सिगारेटचे चटके देऊन वेळोवेळी वाईटसाईट शिवीगाळ व दमदाटी केली. तसेच विवाहितेच्या आईवडिलांनी लग्नाच्या वेळी दिलेले स्त्रीधन अंगावरून काढून घेत तिचा शारीरिक व मानसिक छळ केला.
 
दरम्यान वारंवार होणार्‍या छळाला कंटाळून या विवाहितेने अंबड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार पतीसह सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार चव्हाण करीत आहेत.