गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 21 मार्च 2022 (19:04 IST)

तृतीयपंथीयांनी लावले लग्न!

लातुरातील माताजी नगर परिसरात कावाले परिवार राहत असून त्यांची मुलगी पूजाचे आज लग्न लागले आहे. मात्र पूजाची आई ही मेसमध्ये पोळ्या करते तर वडील हे लागेल ती काम करतात यामुळे घरची आर्थिक परिस्थिती अतिशय बिकट होती. याची माहिती त्याच भागात राहणार्‍या तृतीयपंथी प्रिया लातूरकर याना लक्षात आली. या कुटुंबाला काहीतरी मदत करावी अशी भावना प्रिया लातूरकर यांच्या मनात आली. त्यानंतर ही गोष्ट त्यांनी आपल्या सहकार्‍यांना बोलून दाखवली. त्यामुळे सर्व तृतीयपंथीयांनी एकत्र येत एक निर्णय घेतला व हे लग्न आपण पुढाकार घेऊन करून घ्यावे. आर्थिक भार प्रिया लातूरकर यांनी उचलण्याचा निर्णय घेतला.