गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 19 जानेवारी 2021 (21:22 IST)

बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

राज्य मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमातून रद्द झालेल्या जुन्या विषयांसह बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा दिला आहे. वर्षापासून बारावीसाठी सुधारित विषय आणि मूल्यमापन योजना निश्चित केली आहे. यानुसार शाखा निहाय गट ए, बी, सी यामध्ये विषयांची विभागणी करण्यात आली असून काही विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत. 
 
यासंदर्भात ८ ऑगस्ट २०१९ रोजी याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला होता. मात्र ज्युनिअर महाविद्यालये आणि शिक्षकवर्गाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने शिक्षकांनी जुन्या अभ्यासक्रमाच्या विषय योजनेनुसार, विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरू ठेवला. दरम्यान, जे विषय अभ्यासक्रमातून रद्द केले आहेत त्या विषयांचीच विद्यार्थ्यांनी बारावीच्या परिक्षेच्या दृष्टीने तयारी केली. ही बाब बारावीच्या विद्यार्थ्यांनी परीक्षेचे अर्ज भरले त्यावेळी ही बाब लक्षात आली. ज्यावेळी जे विषय अभ्यासक्रमातून वगळले गेले ते विषय परीक्षा अर्जात समाविष्ट नव्हते.
 
 
परंतु विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना फक्त यंदा जुन्या विषयांची परीक्षा देण्याची मान्यता दिली आहे. तसेच जुन्या विषयांची परीक्षा देणारे जे विद्यार्थी त्या विषयात किंवा अन्य विषयांत नापास होतील त्यांना पुन्हा तोच विषय घेऊन फेरपरीक्षा देण्याची संधी मिळणार आहे.