शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (15:36 IST)

बीड येथे एकाच कुटुंबातील चौघाचा जागीच मृत्यू

बीड येथील एक व्यापारी कुटुंब पुण्याहून बिडकडे जात असताना त्यांच्या कारला धामणगाव घाटात अपघात झाला. या अपघातात बीड येथील टेकवानी व्यापारी यांच्या कुटुंबातील चौघाचा जागीच मृत्यू झाला.
 
11 तारखेला संध्याकाळी हा अपघात घडून आला आहे. एक क्रेटा MH 23 SS 4025 ही गाडी चालकाच्या हाताने अनावधानाने रस्त्याच्या कडेला काठड्याला जाऊन आदळली. हा अपघात एवढा मोठा होता की 4 ही जणांचा दवाखाण्यात नेण्या अगोदर मृत्यू झाला यामुळे परिसरात एकच हळहळ व्यक्त होत आहे.