शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 12 मे 2022 (15:01 IST)

भाजपची साथ सोडत संभाजी राजेंनी राज्यसभेचे असे मांडले गणित

SAMBHAJIRAJE CHHATRAPATI
राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदार म्हणून मुदत संपल्यानंतर छत्रपती संभाजीराजे  यांनी आज नवीन भूमिका जाहीर केली. पत्रकार परिषद घेऊन त्यांनी राज्यसभेची निवडणूक (rajya sabha election)लढवणार आणि स्वराज्य संघटनेची स्थापना करण्याची घोषणा केली. दुसऱ्या आर्थाने भाजपची साथ सोडल्यानंतर राजकारणात कायम राहण्याचं स्पष्ट संकेत संभाजी राजे यांनी दिले.
 
भाजपसंदर्भात बोलतांना संभाजी राजे म्हणाले, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलून विनंती केली की, राष्ट्रपती नियुक्त खासदार व्हावं. म्हणून मी ते पद स्विकारलं. मी राष्ट्रपती महादोय, पंतप्रधान मोदी, देवेंद्र फडणवीस यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. भाजपची उमेदवारी मिळणार नाही, अशी शक्यता दिसल्याने अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला. यावेळी भाजप आणि महाविकास आघाडीची उर्वरित मते आपणास मिळावी आणि काही अपक्षांनी आपणास साथ द्यावी, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली.
 
राज्यातून राज्यसभेचे भाजप 3, राष्ट्रवादी 1, काँग्रेस 1 , शिवसेना 1 असे आधीचे समीकरण होतं. आता हेच समीकरण भाजप 2, आणि महाविकास आघाडीच्या 3 असे झाले आहे. सहाव्या जागेसाठी भाजपकडे 22 मते तर महाविकास आघाडीकडे 27 मते आहेत. जिंकण्यासाठी 42 मतांचा कोटा हवा आहे. या दोन्ही पक्षांनी संभाजी राजे यांना मते दिल्यास ते सहज निवडून येऊ शकतात. तसेच कोणत्या एका पक्षातर्फे निवडणूक लढवल्यास सहावी जागा निवडून आणण्यासाठी मतांची फोडाफोड करावी लागणार आहे. परंतु अपक्ष निवडणूक लढवल्यास सर्वच पक्षांची मते मिळू शकतात आणि निवडून येणे शक्य होईल, असा अंदाज संभाजी राजे यांचा आहे. आता हे पक्ष संभाजीराजेंना पाठिंबा देतात का, हे पुढील काळात स्पष्ट होईल.