शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (16:58 IST)

मनसेचा ‘केम छो? ला विरोध, ‘केम छो?’ का असा केला प्रश्न

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प  येत्या २४ फेब्रुवारीपासून दोन दिवसीय दौऱ्यावर येणार असून ते दिल्ली आणि अहमदाबादला भेट देणार असल्याचे जाहीर करण्यात आलं आहे. त्यामुळे अहमदाबादमध्ये सध्या जोरदार तयारी सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या या कार्यक्रमाला ‘केम छो मिस्टर प्रेसिंडेंट’ असं नावं देण्यात आल्याचं समोर आलं आहे. मात्र मनसेने या कार्यक्रमाला विरोध करत या कार्यक्रमाचं नावं ‘केम छो?’ का असं प्रश्न विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांनी ट्विट करत असं लिहिलं की, ‘अमेरिकन राष्ट्राध्यक्ष २४ फेब्रुवारीला अहमदाबादला भेट देणार आहेत. पुन्हा अहमदाबाद! आणि, त्या कार्यक्रमाचं म्हणे नाव असणार आहे  “केम छो मिस्टर प्रेसिडेंट?”.. “केम छो?”.. “केम छो” का?’