मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: अहमदनगर , बुधवार, 12 फेब्रुवारी 2020 (16:09 IST)

कीर्तनकार इंदोरीकर महाराज अडचणीत?

एका कीर्तनाच्या कार्यक्रमात गर्भलिंग निदानाबाबत वक्तव्य केल्यामुळे ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख इंदोरीकर अडचणीत सापडले आहेत. त्यांच्या या वक्तव्याची गंभीर दखल आरोग्य विभागाने घेतली असून, याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. सम तिथीस स्त्रीसंग केल्यास मुलगा होतो', 'विषम तिथीस केला तर मुलगी होते' असे वक्तव्य त्यांनी केले होते. तसेच याबाबत सत्यता तपासून पुरावे हाती आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्याचा निर्णय जिल्हा रुग्णालयाच्या पीसीपीएनडीटी समितिच्या बैठकीत घेण्यात आला. 
 
इंदोरीकर महाराजांनी केलेल्या या विधानाबाबत समिती बैठकीत चर्चा करण्यात आली. या वक्तव्याबाबत पुरावे जमा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या वक्तव्याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागवण्यात येणार आहे. अधिक पुरावेही जमा करण्यात येणार आहेत. या वक्तव्यावरून पीसीपीएनडीटी कायद्याचे उल्लंघन होत आहे का, हे देखील तपासले जाणार आहे. जिल्हा आरोग्य विभागामार्फत नोटीस देखील पाठवण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागातून देण्यात आली. इंदोरीकर महाराजांनी केलेल्या या वक्तव्याची दखल आरोग्य विभागाने घेतली आहे. याबाबत पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. पीसीपीएनडीटी समितीच्या नुकच्याच झालेल्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे इंदोरीकर यांच्याकडून यावर स्पष्टीकरण मागवण्यात येणार आहे. तसेच यामध्ये सत्यता आहे का हे आधी तपासणी केली जाणार आहे. त्यानंतर पुरावे हाती आल्यानंतर त्यांना नोटीस बजावण्यात येणार आहे, अद्याप मात्र नोटीस बजावलेली नाही, असे जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉ. प्रदीप मुरंबीकर यांनी सांगितले.