मंगळवार, 19 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : सोमवार, 16 जून 2025 (12:59 IST)

हवामान विभागाकडून महाराष्ट्रातील विविध भागात पावसाचा अलर्ट जारी

Maharashtra weather update
सध्या मान्सून सक्रिय होत असल्याने हवामान विभागाने राज्यातील विविध भागात अलर्ट जारी केला आहे. आज सोमवारी दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट, रत्नागिरी, पुणे घाट विभाग, सातारा घाट विभाग, कोल्हापूर घाट विभाग, सिंधुदुर्ग येथे ऑरेंज अलर्ट, आणि मुंबई, ठाणे, पालघर, नाशिक घाट विभाग, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली येथे पावसाचा यलो अलर्ट जारी केला आहे. 
हवामान खात्याच्या अंदाजानुसार विदर्भातील बुलढाणा, अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान विभागाने मुंबई शहर आणि उपनगरात पुढील 3 तास मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. 
रविवारी महाराष्ट्रातील अनेक भागात मुसळधार पावसाने हजेरी लावली असून मुसळधार पावसामुळे वीज कोसळून 8 जणांचा मृत्यू झाला आहे. आणि 10 जण जखमी झाले आहे. 
कोकणातील प्रमुख नद्यांपैकी रत्नागिरी जिल्ह्यातील जगबुडी नदी धोक्याच्या पातळीपेक्षा वर वाहत आहे. आपत्ती व्यवस्थापन अहवालात असे म्हटले आहे की जर पाण्याची पातळी आणखी वाढली तर नदीकाठच्या खेड, अलसुरे, चिंचघर आणि प्रभुवाडी गावांना त्याचा फटका बसू शकतो.
हवामान विभागाने रत्नागिरी आणि रायगड सारख्या किनारी जिल्ह्यांसाठी 'रेड अलर्ट' आणि पालघर, ठाणे, सिंधुदुर्ग आणि पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटांसाठी 'ऑरेंज अलर्ट' जारी केला आहे. मदत आणि बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (एनडीआरएफ) आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
Edited By - Priya Dixit