शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (21:59 IST)

म्हाडा परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर

राज्यातील म्हाडा आणि एमपीएससीच्या परीक्षा एकाच दिवशी आल्याने म्हाडाने त्यांच्या नियोजित परीक्षांच्या तारखा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता. परीक्षाच्या नव्या तारखा लवकरच जाहीर करू असे सांगण्यात आले होते. त्यानुसार आता म्हाडाच्या परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. 7, 8 आणि 9 फेब्रुवारी रोजी म्हाडाच्या परीक्षा होणार आहे. म्हाडाच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना संपूर्ण वेळापत्रक पाहता येईल. म्हाडा, टीईटी आणि आरोग्य भरतीच्या परीक्षांच्या तारखा एकत्र जाहीर झाल्याने मोठा घोळ झाला. विद्यार्थ्यांना म्हाडा आणि एमपीएससीच्या तारखा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांकडून देखील तक्रारी आल्या. त्यामुळे म्हाडाने त्यांच्या नियोजित परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला होता.
म्हाडाच्या क्लस्टर-6 सहाय्यक,वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक टंकलेखनाची परीक्षा या आधी 29 आणि 30 जानेवारी रोजी होणार होत्या मात्र म्हाडाच्या नव्या वेळापत्रकानुसार, दिनांक 7, 8 आणि 9 फेब्रुवारीला होणार आहेत. तिनही दिवशी सकाळी 9 ते 11:00, दुपारी 12:30 ते 3:30 आणि संध्याकाळी 4:00 ते 6:00 या वेळेत परीक्षा घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यी पुन्हा एकदा परीक्षेच्या तयारीला लागले आहेत.
याआधीही म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फुटल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. आता एमपीएससीची परीक्षा पुन्हा एकदा म्हाडाच्या परीक्षांच्या वेळेतच आल्याने म्हाडाला पेपर पुन्हा एकदा पुढे ढकलण्याची वेळ आली. १२ डिसेंबर, १४ डिसेंबर, १९ डिसेंबर आणि २० डिसेंबर रोजी राज्यात म्हाडाच्या परीक्षा होणार होत्या. काही अपरिहार्य आणि तांत्रिक अडचणींमुळे होणाऱ्या म्हाडाच्या परिक्षा रद्द करण्यात आल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले होते. त्यानंतर नव्या तारखा जानेवारी महिन्यात जाहीर करण्यात आल्या मात्र  म्हाडाच्या परीक्षेच्या तारखा हा एमपीएससीच्या परीक्षेच्या दिवशीच आल्याने अखेर म्हाडाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.