शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 6 जानेवारी 2022 (21:06 IST)

असा आहे 55 वर्षांच्या वरील पोलिसांसाठी महत्त्वाचा निर्णय

राज्यातील बहुतांश मंत्र्यांना आणि आमदारांना कोरोनाची लागण झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील 55 वर्षांच्या वरील पोलिसांसाठी  महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील वर्षे 55 आणि त्याहून अधिक वय असलेल्या पोलिसांना आता पुढील काळात वर्क फ्रॉम होम काम करण्याची संधी मिळणार आहे, असे आदेश राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत पन्नास वर्षांच्या वरीलव्यक्तींना सर्वाधिक फटका बसला होता. त्यात पोलीस हे अत्यावश्यक सेवेत येत असल्यामुळे अशा पोलिसांना त्रास सहन करावा लागू नये म्हणून आता राज्यभरातील 55 वर्षांच्या वरील पोलीसानासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.