शुक्रवार, 15 ऑगस्ट 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 फेब्रुवारी 2022 (08:39 IST)

मिलींद नार्वेकर तिकीटं विकणारे एजंट – निलेश राणे

Milind Narvekar Ticket Selling Agent - Nilesh Rane
माजी खासदार निलेश राणे यांनी विनायक राऊत आणि मिलींद नार्वेकरांचा समाचार घेतला आहे. विनायक राउत यांचा इतिहास कच्चा आहे.आमच्या विरोधात अशोक चव्हाण चुकीची फिडींग दिल्लीत लावत होते, म्हणून कंटाळून आम्ही काँग्रेस सोडली. अशोक चव्हाण तेव्हा तसे वागले नसते. तर तो निर्णय घेतला नसता, असे निलेश राणे म्हणाले आहेत. तर त्यांनी मिलींद नार्वेकरांना तिकीटं विकणार एजंट आहे म्हणत खिल्ली उडवली आहे.
 
आमच्यावर कोणती कारवाई होती विनायक राउत यांनी सांगावं, नाहीतर राजकारण सोडावं. ते पुराव्याच्या आधारावर कधी बोलत नाहीत. शिवसेनेत तिकिट वाचवण्यासाठी ते आहेत, अशी टीका राणेंनी केली आहे. नेते पद नव्हत तरी त्यांना राणे साहेबांनी बाळासाहेबांना मुख्यमंत्री केलं ना. विनायक राऊतांना साधे मंत्रीही नाही केलं. राणे साहेबांच काय वजन आहे शिवसेनेत ते २००५ साली आणि त्या आधीच दाखवलं आहे. विनायक राउत यांनी स्वतच वजन बघावं, असा टोला त्यांनी लगावला आहे. नारायण राणेंची नेता व्हायची लायकी नव्हती म्हणून बाळासाहेबांनी त्यांना नेतेपद दिलं नाही. संजय राऊतांना बाळासाहेबांनी नेते बनवलं होतं. अशी टीका काही वेळापूर्वीच विनायक राऊत यांनी केली होती. त्यालाच निलेश राणे यांनी प्रत्युत्तर दिले आहे.