मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (21:27 IST)

संजय राऊत यांना राज्यसभेतून निलंबित करा

भाजपाचे आध्यात्मिक आघाडी प्रमुख आचार्य तुषार भोसले यांनी खासदार संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करा, अशी मागणी केली आहे.
भाजपचे आचार्य तुषार भोसले यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून संजय राऊत यांना तात्काळ राज्यसभेतून निलंबित करण्याची विनंती केली आहे. पत्रकार परिषदेत खुलेआम शिवीगाळ करणारे शिवसेना खासदार संजय राऊत हे साधु- संतांनी घडवलेल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कलंक आहेत. वेळोवेळी खालच्या दर्जाची भाषा वापरणाऱ्या संजय राऊतांना राज्यसभा सदस्य, या संवैधानिक पदावर राहण्याचा नैतिक अधिकार नाही, त्यामुळे त्यांना तात्काळ निलंबित करावे, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे.