शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 28 सप्टेंबर 2022 (21:02 IST)

पकडलेली लाखों रूपयांची अवैध दारू पोलिसांकडून नष्ट

पोलीस प्रशासनाकडून केल्या जाणार्‍या अवैध दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेला मुद्देमाल नष्ट करण्याचे काम पोलिसांकडून सुरू करण्यात आले आहे.
येथील तोफखाना पोलिसांनी लाखो रूपयांची पकडलेली अवैध देशी व विदेशी दारू नष्ट केली आहे.अहमदनगर शहर येथील  तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही वर्षांमध्ये लखों रूपयांची देशी व विदेशी अशी अवैध व बनावट दारू कारवाईमध्ये जप्त करण्यात आलेली होती.
अनेक वर्षांपासून हा साठा पडून होता. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन रितसर पंचनामा करून सदरचा मुद्देमाल नष्ट करण्याचे काम सुरू केले आहे.
सुमारे आठ ते दहा लाख रूपयांची बनावट व विक्रीसाठी चाललेली पकडलेली दारू नष्ट करण्यात आल्याचे निरीक्षक गडकरी यांनी सांगितले.