1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
  4. Milk price hiked by Rs 4 per liter in Maharashtra

महाराष्ट्रात दूध प्रति लिटर ४ रुपयांनी महाग; दुग्धजन्य पदार्थांच्या किमतीत १० टक्क्यांनी वाढ

महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटर ४ रुपयांनी वाढले आहे. दुग्धजन्य पदार्थही १० टक्क्यांनी महाग झाले आहे.

महागाईने आधीच त्रस्त असलेल्या सामान्य जनतेला आता दुधाच्या दरवाढीचा धक्का बसणार आहे. महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधाचे दर प्रति लिटर ४ रुपयांनी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य दूध उत्पादक आणि व्यावसायिक कल्याण संघटनेने हा निर्णय घेतला आहे. याचा परिणाम राज्यातील लाखो दूध ग्राहकांच्या मासिक बजेटवर होऊ शकतो. याशिवाय, दुग्धजन्य पदार्थांच्या दरात १० टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुधाच्या दरवाढीसंदर्भात शुक्रवारी पुणे शहरातील कात्रज डेअरीच्या कार्यालयात बैठक झाली. यात राज्यातील ४५ सहकारी आणि खाजगी दूध ब्रँडचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या बैठकीत दुधाच्या विक्री दरात प्रति लिटर ४ रुपयांनी वाढ करण्यास सहमती दर्शवण्यात आली. चीज, तूप आणि इतर दुग्धजन्य पदार्थांच्या दरातही १० टक्क्यांपर्यंत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुढील लेख
LIVE: महाराष्ट्रात गाय आणि म्हशीच्या दुधाच्या दरात प्रति लिटर ४ रुपयांची वाढ