शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 5 एप्रिल 2021 (09:09 IST)

नगर तालुका दूध संघात कोट्यवधींचा गैरव्यवहार

अहमदनगर तालुका दुध संघाच्या तत्कालीन संचालक मंडळाने 8 कोटी 52 लाख 68 हजार 28 रूपयांचा गैरव्यवहार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर (वय 54 रा. भुतकरवाडी, सावेडी, नगर) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
 
याबाबत अधिक माहिती अशी कि, मार्च 2019 ते मार्च 2020 या काळात नगर तालुका दूध संघात आरोपींनी खोटे लेखे तयार केले, दस्तऐवजात खोट्या नोंदी केल्या,कर चुकविण्याच्या गैरहेतुने नियोजन करुन शासनाची फसवणुक होण्याच्या उद्देशाने संगणमताने कट करून खोटे व चुकीचे लेखे तयार केले.फसवणुकीच्या उद्देशाने कर्मचार्‍यांच्या देय असलेल्या रक्कमा हिशोबातुन काढुन निरंक (अद्रुष्य) करुन गैरव्यवहार केला.
 
या प्रकरणी सहकारी संस्थाचे जिल्हा विशेष लेखापरीक्षक नारायण धुरपदराव गाधेकर यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून 20 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये गोरख पाराजी पालवे, उद्धव रावसाहेब अमृते, किसन बाबुराव बेरड, मोहन संतुजी तवले,कैलास अंजाबापु मते, सागर शेषराव साबळे, भाऊसाहेब गंगाराम काळे, रामदास शंकर शेळके, बजरंग किसन पाडळकर,सुभाष गंगाधर लांडगे, अर्जुन सर्जराव गुंड, राजाराम चंद्रभान धामने, मधुकर किसन मगर, भिमराज रामभाऊ लांडगे, गोरख रामभाऊ काळे,स्वप्निल बाबासाहेब बुलाखे, वैशाली आदिनाथ मते, पुष्पा शरद कोठुळे, गुलाब केरुजी कार्ले, गुलाब मारुती काळे यांचा समावेश आहे.