सोमवार, 1 सप्टेंबर 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 31 मार्च 2022 (21:30 IST)

मंत्री छगन भुजबळ धावले अपघातग्रस्तांच्या मदतीला

Minister Chhagan Bhujbal rushed to the aid of accident victims
राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील कार्यक्रमातून परतत असतांना नाशिक पुणे महामार्गावर चारचाकी आणि दुचाकीमध्ये अपघात झालेला होता. यावेळी मंत्री छगन भुजबळ यांनी आपला वाहनाचा ताफा थांबवित तातडीने अपघातग्रस्तांची भेट घेतली. त्यांनी आपल्या कर्मचारी आणि पोलिसांच्या मदतीने आपल्या ताफ्यातील गाडी अपघातग्रस्ताला उपलब्ध करून देत तातडीने सिन्नर येथील रुग्णालयात पाठविले.
 
त्यानंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आपल्या स्वीय सहायकांना सूचना करत सिन्नर येथील डॉक्टरांना माहिती देऊन योग्य ते उपचार करण्याच्या सूचना दिल्या. तसेच अपघात ग्रस्त कुटुंबाला आवश्यक ती मदत उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांचा ताफा नाशिककडे मार्गस्थ झाला.