बुधवार, 28 फेब्रुवारी 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: मंगळवार, 27 डिसेंबर 2022 (14:55 IST)

मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार?

jitendra awhad
सरकारमधील मंत्री दादा भुसे यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी हा व्हिडिओ शेअर करत प्रश्न उपस्थित केला आहे. व्हिडिओमध्ये नाशिकचे पालकमंत्री असलेले दादा भुसे एका तरुणाला चापट मारताना आणि शिव्या देताना दिसत आहेत.
हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी काही सवाल उपस्थित केले आहे. भुसेंवर कारवाई करण्याचा संदर्भ देत आव्हाड यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आव्हान दिले आहे. आपल्या ट्विटमध्ये आव्हाड म्हणतात, ''मंत्री दादा भूसे फटकावतात. शिव्या देतात. मुख्यमंत्री साहेब, कुठला गुन्हा पोलिस घेणार? पोलिसांसमोर मारले. माझा नग्न फोटो fb वर टाकणाऱ्याला आपण मांडीवर  बसवलत, #सीबीआय चौकशी लागावी म्हणून वकिलांची फौझ उभी केलीत. सुप्रीम कोर्टामध्ये रात्री त्या विकृताबरोबर आपली बैठक, आता बोला..'' असे ट्विट आव्हाड यांनी केले आहे.
 
व्हिडिओमध्ये नेमकं काय?
मालेगाव शहरात महाशिवपुराण कथेचे आयोजन पालकमंत्री दादा भुसे यांनी केले आहे. ही कथा ऐकण्यासाठी लाखों भाविकांची गर्दी होत आहे. गर्दीमध्ये काही चोरट्यांनी पाकीटमारी आणि महिलांचे दागिने चोरण्याचा प्रयत्न केला, पण दोघा संशयितांना पोलिसांनी पकडले. यातील एकाला दादा भुसे यांनी आधीच्या दिवशीच पोलीसांच्या ताब्यात देऊन कारवाई करण्याचे आदेश दिले होते.
 
तोच चोर बस स्थानक परिसरात आढळून आल्याने दादा भुसे तिथे पोहचले होते. यावेळी आक्रमक झालेल्या दादा भुसे यांनी थेट दोघा तरुणांचे फोटो काढा म्हणत शिवीगाळ केली, त्यात एकच्या श्रीमुखातही भडकवली. यावेळी बाजूलाच पोलिसही उपस्थित होते. 
 
Edited By- Ratnadeep Ranshoor