रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 6 डिसेंबर 2021 (08:35 IST)

मंत्र्यांचा इशारा महाराष्ट्राला लाॅकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर…..

महापरिनिर्वाण दिनानिमित्त संवाद कार्यक्रमाला नवाब मलिक यांनी हजेरी लावली होती.राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यानी केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. केंद्राकडून वेळीच आफ्रिकी देशांवरील विमानांवर नियंत्रण करण्यात आलं नाही. असं मलिक म्हणालेत तसेच सरकारनं दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करावं, सर्वांनी लसीकरण करुन घ्यावे. लाॅकडाऊनच्या दिशेनं जायचं नसेल तर लसीकरण आवश्यक आहे. असंही मलिक म्हणालेत.
दरम्यान जय भीम चित्रपटात एकदाही बाबासाहेबांचं नाव नाही, घोषणा नाही मात्र त्या चित्रपटातील विचारातून एक संदेश देण्यात आलेला आहे. जिथे अन्याय अत्याचार होत असेल तिथे तिथे एकत्र येणं गरजेचं आहे. या देशातपूर्वी एका समाजावर अन्याय झाला आहे हे नाकारू शकत नाही.
यातून बाबासाहेबांनी बाहेर काढलं, बाबासाहेब हे एका जातीचे नाहीत, ते सर्वांचे आहेत, अशी प्रतिक्रिया मलिक यांनी दिलीय. 1 जानेवारी रोजी भीमाकोरेगावमध्ये झालेली दंगल भडकवण्यात आली होती. माजी न्यायाधिशांनी आयोजित केलेल्या एल्गार परिषदेला मोठ्याप्रमाणास नागरिक आले होते.
ही घटना झाल्यानंतर अनेकांना अटक झाली सुधा भारद्वाज यांनाही आरोपी करण्यात आलं. एल्गार परिषदेत जमा झालेल्यांवर पंतप्रधान यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप करण्यात आला त्यावर मी पहिल्यांदा आक्षेप घेतला, असंही मलिक यावेळी म्हणालेत.
यात भांडाफोड होईल हे लक्षात येताच, ही केस केंद्राकडे वर्ग केली, केंद्रीय तपास यंत्रणेच्या माध्यमातून चुकीच्या पद्धतीने कारवाई करत आहेत, असा आरोपही त्यांनी केला आहे.