संबंधित माहिती
- खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण; नाशिक पोलिसांनी जबरदस्त शक्कल लढवत शोधले आरोपी
- स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचा पहिला टप्पा मार्च २०२३ पर्यंत पूर्ण होणार
- कार्तिकी एकदशीच्या दिवशी 'ड्राय डे' असताना पाटी: औरंगाबाद न्यायालयात ९० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला
- थंडीचा कडाका वाढताच विठुरायाला परिधान केला उबदार पोशाख
- डॉ. राणी बंग रुग्णालयात दाखल, मुंबईच्या रिलायन्स रुग्णालयात हलवण्यात येणार
गौण खनिज उत्खनन प्रक्रिया होणार ऑनलाईन; असा होणार फायदा
मुंबई – अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी तसेच उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन करण्यात येणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांनी सांगितले.
गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबतची बैठक आज महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला आमदार धैर्यशील माने, आमदार जयकुमार गोरे, कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
श्री. विखे- पाटील म्हणाले की, अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्याने कळीचा मुद्दा ठरला आहे. अनेकदा उत्खननावर आळा घालणाऱ्या महसूल अधिकारी, कर्मचाऱ्यांवर हल्लेही झाले आहेत. वैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतुकीसाठी ऑनलाईन प्रक्रिया आणल्यामुळे अवैध वाहतुकीला आळा बसणार असून वैध प्रक्रिया सुलभपणे राबविणे व त्याचे प्रभावी नियंत्रण करणे शक्य होणार आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor
