गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 17 नोव्हेंबर 2022 (08:07 IST)

कार्तिकी एकदशीच्या दिवशी 'ड्राय डे' असताना पाटी: औरंगाबाद न्यायालयात ९० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला

drinks
कार्तिकी एकदशीच्या दिवशी 'ड्राय डे' असताना अवैधपणे दारू विकणारे व दारू पिण्यास मद्यपींना जागा उपलब्ध करून देणाऱ्या चार ढाब्यांवर राज्य उत्पादन शुल्कच्या 'ब' विभागासह भरारी पथकाने छापा मारीत दोन ढाबा मालकांसह २९ मद्यपींना पकडले होते. या आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल करून सत्र न्यायालयात हजर केले असता, ९० हजार ५०० रुपयांचा दंड ठोठावला. तर 'क' विभागाच्या एका कारवाईत एक ढाबामालकासह सहा मद्यापींना खुलताबाद न्यायालयाने २८ हजार रुपये दंड केल्याची माहिती अधीक्षक संतोष झगडे यांनी दिली.
 
४ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशीच्या दिवशी समर्थनगर भागातील हॉटेल खालसा पंजाबी हॉटेल येथे छापा मारल्यानंतर मालक संतोषसिंग बलविंदरसिंग सिद्धू (रा. बाबा पेट्रोल पंप, म्हाडा कॉलनी) यांच्यासह मद्यसेवन करणारे करणसिंग सुनील अग्रवाल, महेश भाऊसाहेब खवले, वसीमखान चाँदखान, सिद्धार्थ निवृत्ती भालेराव, अजय रविंद्र सावळे, स्वप्नील सदानंद गांगुर्डे, मनोहर श्यामराव वागतकर, राहुल शामराव खोसरे, जगदिश ताराचंद गुडीवाल, गाेविंदसिंग सैतानसिंग राठोड, नरेंद्र भागवतराव कोळपकर यांना पकडले. या सर्वांच्या विरोधात गुन्हा नोंदवून सत्र न्यायालयात हजर केले असता, हॉटेल मालकास २५ हजार व १२ मद्यापींना प्रत्येकी ५०० रुपये दंड करण्यात आला. दुसरी कारवाई जालना रोडवरील सुंदरवाडी येथील ब्लु बर्ड याठिकाणी करण्यात आली. त्याठिकाणी हॉटेल चालक धनश्याम दिगांबर मोरे (रा. रामनगर) यांच्यासह मद्यसेवन करणारे सुनील माणिकचंद पेंढरकर, विजय सुरेश सोनवणे, विजय एकनाथराव गवळी, गणेश जगन्नाथ घोडे, बाळासाहेब मच्छिंद्र राऊत, तुषार पद्ममाकर कुळकर्णी यांना पकडले. यात मालकास २५ हजार रुपये आणि सहा मद्यपींना प्रत्येकी २ हजार ५०० रुपये दंड करण्यात आला.
 
Edited by: Ratnadeep Ranshoor