सातारा फलटणमध्ये भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली निर्जन ठिकाणी नेऊन अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार
फलटणमध्ये भूतबाधा उतरवण्याच्या नावाखाली एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार झाल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. पोलिसांनी आरोपी सौरभ मडणे याला अटक करून पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार फलटणमध्ये अंधश्रद्धा आणि गुन्हेगारीचे एक गंभीर प्रकरण उघडकीस आले आहे. एका अल्पवयीन विद्यार्थिनीवर भूतबाधा झाल्याचा दावा करत तिच्यावर अघोरी विधी करण्यात आले आणि त्यानंतर तिला एका निर्जन ठिकाणी नेऊन तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी सौरभ नाना मडणे याला अटक केली आहे. दरम्यान, पीडितेच्या कुटुंबीयांनी अघोरी विधी होत असल्याचा आणि घराबाहेर धमकीचे पत्र मिळाल्याचा आरोप करत सुरक्षेची मागणी केली आहे. तसेच आरोपीविरुद्ध पॉक्सो कायदा आणि जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे.

