शनिवार, 4 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (16:43 IST)

बेपत्ता यू ट्युबर काव्या मध्यप्रदेशात सापडली

youtuber kavya
औरंगाबादातील प्रसिध्द युट्युबर 16 वर्षीय बिंदास्त काव्या अखेर मध्यप्रदेशमधील इटारसीमध्ये सापडली आहे. ती गेल्या दोन दिवसांपासून ती बेपत्ता होती.ती सापडल्यामुळे तिच्या आई-वडिलांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे. तिच्या बेपत्ता झाल्यामुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. 
काव्या शुक्रवार पासून बेपत्ता झाली असून तिच्या आईवडिलांनी सोशल मीडियाद्वारे ती कधीच एकटी राहत नाही, ती सापडल्यास आम्हाला कळवा असे आवाहन  करून व्हिडीओ प्रसिद्ध केले होते.  
 
याप्रकरणी कुटुबियांनी पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. परंतु, पोलीस सहकार्य करत नसल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला होता. परंतु, अखेर काव्या मध्यप्रदेशातील इटारसीमध्ये सापडली आहे.
 
कमी वयात काव्याने युट्युबवर यशस्वी भरारी घेतली आहे. तिचे यूट्युबवर 4.32 मिलियन सबक्राबर आहेत.