शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 10 सप्टेंबर 2022 (14:12 IST)

शिवसेना-शिंदे गटात राडा, तर शिंदे गट आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढल्याचे चित्र

shinde uddhav raj
गणेश विसर्जनावेळी दादरमध्ये शिवसेना आणि शिंदे गट आमनेसामने आल्यानं काही काळ तणाव निर्माण झाला. यामध्ये दादरमध्ये शिवसेनेचे संजय भगत आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर हे एकमेकांसमोर आल्यानंतर दोन्हीबाजूने घोषणाबाजी झाली. याचवेळी प्रभादेवी येथे मनसेने उभारलेल्या स्टेजवर शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरही उपस्थित होते. मनसे नेते संतोष धुरी यांच्या व्यासपीठावर आमदार सदा सरवणकर हजर होते. त्यामुळे शिंदे गट आणि मनसे नेत्यांची जवळीक वाढल्याचं चित्र दादरमध्ये पाहायला मिळालं.
 
प्रभादेवीत शिवसेनेचे संजय भगत आणि शिंदे गटाचे समाधान सरवणकर आमनेसामने आले. त्यावेळी समाधान सरवणकरांनी बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार एकनाथ शिंदेचे पुढे घेऊन जात आहे. पुढच्या वर्षीही याच जल्लोषात हिंदु सण साजरे करणार असं म्हणत म्याव म्याव घोषणा देण्यात आल्या. यावेळी प्रभादेवी परिसरात प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. मनसेच्या स्टेजवर असणारे आमदार सदा सरवणकर म्हणाले की, गणेशोत्सवात सगळीकडे हिंदुत्वाचा उत्साह पाहायला मिळत आहे. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिंदे गट आणि मनसे एकत्र दिसत आहेत. त्यामुळे गणेश विर्सजनाच्या स्टेजवर आम्ही एकत्र आलोय असं त्यांनी सांगितले.