रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (15:14 IST)

आमदार रोहित पवार सहकुटुंब तीर्थयात्रेला

rohit pawar
अयोध्या दौरे हा विषय सध्या राज्यातल्या राजकारणात चर्चेच्या प्रमुख विषय आहे. राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याची चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या दौऱ्याची चर्चा होत आहे जे राज ठाकरेंआधीच अयोध्येत जात आहेत.
 
रोहित पवार सध्या सहकुटुंब तीर्थयात्रेला असून काल त्यांनी राजस्थानमधल्या राधा गोविंद मंदिराला भेट दिली. त्यानंतर पुष्करचं ब्रह्म मंदिर, सुफी संत ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांचा अजमेर इथला दर्गा इथंही रोहित पवारांनी भेट दिली. या ठिकाणी आपण देशाच्या आणि राज्याच्या कल्याणासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं.
 
चार दिवसाच्या या राजस्थान दौऱ्यानंतर आता रोहित पवार पुढे उत्तर प्रदेश दौऱ्यावर निघाले आहेत. आपल्या परिवारासोबत या दौऱ्यादरम्यान पवार आज अयोध्येत असणार आहेत.