शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 7 मे 2022 (14:02 IST)

लिफ्ट देत नाही म्हणून रागाच्या भरात शेजाऱ्याची दुचाकीच पेटवली

सातारा- नेहमी दुचाकीवरून इकडे सोड- तिकडे सोड करणार्‍या शेजाऱ्याला दुचाकीवरून लिफ्ट दिली नाही म्हणून त्याने रागाच्या भरात शेजाऱ्याची दुचाकीच पेटवून दिली. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. 
 
मिळालेल्या माहितीनुसार सदर बझारमधील कांगा कॉलनीत राहणारे संजय जाधव हे एमआयडीसीमध्ये काम करतात. महेश मोरे (वय 42) त्यांच्याच शेजारी राहतो. आणि त्याने येता जाताना लिफ्ट मागितल्याने जाधव यांनी त्यास नकार दिला. त्यामुळे त्याने ‘तुझ्या गाडीला पण दाखवितो आणि तुला पण’, अशी धमकी दिली होती. रागाच्या भरात शुक्रवारी रात्री साडेतीनच्या सुमारास महेश मोरे याने संजय जाधव यांची दुचाकी पेटवून दिली. दुचाकी पेटल्याचे दिसल्यावर संजय जाधव व त्यांचे भाऊही झोपेतून उठले आणि दोघांनी घरातील पाणी आणून ही आग विझविली. त्यावेळी मोरे हा तेथून पळून जाताना दिसला. यामध्ये जाधव यांचे चाळीस हजारांचे नुकसान झाले आहे. या प्रकारानंतर संजय जाधव यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.