गुरूवार, 23 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated :रत्नागिरी , शुक्रवार, 14 जुलै 2023 (09:49 IST)

लिफ्टमध्ये अडकले आमदार

मुंबई : भाजपची कार्यशाळा काल मुंबईत पार पडली. यावेळी भाजपचे ३ आमदार लिफ्टमध्ये अडकल्याची घटना घडली. प्रवीण दरेकर, मंदा म्हात्रे, श्वेता महाले हे लिफ्टमध्ये अडकले होते. यावेळी भाजपचे संकटमोचक पुन्हा मदतीला धावले.
 
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजनांच्या मदतीने तिन्ही आमदारांची सुटका करण्यात आली. लिफ्टचा दरवाजा वाकवत महाजन यांनी आमदारांना बाहेर काढले. लिफ्टमध्ये अस्वस्थ आमदार म्हात्रे यांना दरेकरांनी आधार दिला. भिवंडीत हा प्रकार घडला.