1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: गुरूवार, 13 जुलै 2023 (19:06 IST)

टोमॅटोचे दर गगनाला भिडले

tamatar
Tomato prices skyrocketed यावर्षी मान्सूनचे उशिरा आगमन झाले. पाण्याअभावी पिकांचे मोठे नुकसान झाले. आता राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस (Maharashtra Heavy Rainfall) पडत आहे त्यामुळे पिकांचे नुकसान होत आहे. अशामध्ये बाजारात भाजीपाल्यांची आवक घटली आहे.
 
आवक कमी झाल्यामुळे भाजीपाल्यांचे दरात कमालीची वाढ झाली आहे. महागाईमुळे (Inflation) त्रस्त झालेल्या नागरिकांच्या खिशाला आता भाज्यांचे दर वाढल्यामुळे ताण येत आहे. अशामध्ये जेवणाची चव वाढवणाऱ्या टोमॅटोने देखील भाव खाल्ला आहे.सध्या टोमॅटो (Tomato Price) पेट्रोलपेक्षाही महाग झाले आहेत. 
 
पेट्रोलच्या दराने सध्या उच्चांक गाठला आहे. टोमॅटोच्या दरामध्ये मोठी वाढ झाली आहे. 20 रुपये किलोने मिळणारे टोमॅटो आता 140  रुपये प्रतिकिलोने विकले जात आहेत. त्यामुळे टोमॅटो खायचा की नाही असा प्रश्न अनेकांना पडत आहे. बाजारामध्ये भाजीपाला खरेदीला गेलेल्या व्यक्ती टोमॅटोचे दर ऐकूनच ते न घेणं पसंत करत आहेत.