शुक्रवार, 24 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 16 मार्च 2023 (15:35 IST)

महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध

महाविकास आघाडीच्या आमदारांनी चूल रचून गॅस दरवाढीचा केला निषेध
या सरकारचा उपयोग काय, गरीबांच्या घरी जेवण नाय... खावटी अनुदान न देणार्‍या, एसटी कर्मचाऱ्यांना वार्‍यावर सोडणाऱ्या सरकारचा धिक्कार असो... खोके सरकार आले, सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले...बजेटमध्ये भोपळा देणार्‍या सरकारचा धिक्कार असो... महागाई वाढवणार्‍या सरकारचा धिक्कार असो...अशा घोषणा देत महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर येत जोरदार निदर्शने केली. 
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजाचा आजचा बारावा दिवस असून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायर्‍यांवर चूल रचत त्याच्यावर प्रतिकात्मक सिलेंडर ठेवून गॅस दरवाढ आणि महागाईचा निषेध केला.